ग्रामपंचायत सायखिंडी
तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
घर बांधणी / दुरुस्ती परवाना
( ग्रामपंचायत अधिनियम सन १९५८ चे कलम ५२ प्रमाणे )
जावक क्र.
मा. सरपंच , ग्रामपंचायत सायखिंडी
श्री. रा. कडलग लहानभाऊ निवृत्ती यांस
ग्रामपंचायत कार्यक्षेत्र -सायखिंडी, तालुका संगमेनर, जि. अहमदनगर.
घर नं. ३८० यामध्ये तारीख ०७/१०/२०२२ रोजी दिलेल्या अर्जावरून आपणास कळविण्यात येते की ,
खालील शर्तीवर घर /स्फेटीक संडास /बांधकामास /रिपेरिंग कामास परवानगी देण्यात आली आहे.
१) सार्वजनिक रस्त्यावरून जाण्यायेणास कुठल्याही प्रकारचा अडथळा व धोका होईल असे काम करू नये .
२)शेजारच्या जागेत अगर रस्त्यावर,पंचायतीचे जागेत अतिक्रमण होईल असे काम करू नये.
३)बांधकामास परवागी दिल्यापासून १ वर्षाच्या आत काम पूर्ण कारावे. ते न केल्यास आपणास दिलेली परवानगी रद्द झाली असे समजण्यात येईल, घर बांधणी करताना घराचे आजूबाजूस मोकळी जागा ठेवावी.
४)ग्रामपंचायत दिलेल्या परवान्याशिवाय जादा बांधकाम केले असे निदर्शनास आल्यास काम त्वरीत बंद केले जाईल . त्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा करता कामा नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईन.
५) शेत जमिनीत'बांधकाम करावयाचे असल्यास त्याकरिता लागणारी बिनशेतीची परवानगी मे. कलेक्टर साहेब यांजकडून परस्पर घावी. ती न मिळाल्यास ग्रामपंचायतकडून कुठल्याही प्रकारची बाधंकामस परवानगी नाही असे समजावे.
६)संपूर्णपणे घर,संडास बांधणे अगर दुरुस्ती झाल्यानंतर बांधकामाचा झालेला खर्च ग्रामपंचायतीस आकारणीसाठी कळविण्यात यावा.
७)इमारतीच्या वरील लवेचे पाणी पंचायतीचे गटाराचे पुढे येईल असे कोणतेही बांधकाम करू नये.
८)सांडपाण्याचा अगर संडास पाण्याचा निकाल बंद पाईप वाटे स्वखर्चाने पंचायतीचे गटारास जोडून द्यावा.
९)सर्वे नंबर'मध्ये बांधकाम असलेस परिपूर्ण स्वखर्चाने तुमचे गटाराचे,ड्रेनेजचे पाणी पंचायतीचे गटार असेल तिथे जोडून द्यावे.
१०)गॅलरी जमिनीपासून १४ फूटापेक्षा उंची असावी त्यापेक्षा कमी उंचीचा असल्यास ग्रामपंचायत ती काढायची कारवाई करील व कारवाईसाठी होणारा खर्च सुद्धा आपणांसकडून वसूल केला जाईल.
११)बांधकाम करताना शौचालय बांधणे व गटार स्वतः चे बांधकाम करणे बंधन कारक राहील. वरील प्रमाणे घातलेल्या अटी बंधनकारक राहतील,त्याच्या विरुद्ध वर्तन केल्यास होणाऱ्या परिणामास आपण जवाबदार राहाल,
कळावे,
दिनांक :११/१०/२०२२
ग्रामविकास अधिकारी सरपंच
No comments:
Post a Comment